esakal | ऑक्सिजन पुरवठा दोन दिवसात सुरळीत होईल; आयुक्त सौरभ राव यांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Saurabh Rao

ऑक्सिजन पुरवठा दोन दिवसात सुरळीत होईल; आयुक्त सौरभ राव यांची माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ही परिस्थिती निवारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. येत्या दोन दिवसात परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात सौरभ राव यांची महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, आयुक्त राजेश पाटील, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक अभिषेक बारणे, तुषार हिंगे यांनी भेट घेतली व शहरातील आॅक्सिजन पुरवठ्याची वस्तुस्थिती मांडली. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालय, जम्बो, ऑटो क्लस्टर, भोसरी, जिजामाता हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने कोविड रुग्ण उपचार घेत असून ऑक्सिजनची गरज भासत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये देखील दोन दिवसांपासून आवश्यकतेनुसार ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.  गेल्या तीन दिवसांपासून मात्र दररोज एफडीए व विभागीय आयुक्त यांच्याबरोबर चर्चा करून लिक्वीड टँकर उपलब्ध केला जात आहे. ही परिस्थिती लवकर निवारण्यात यावी. तसेच, औद्योगिक क्षेत्रात वापरण्यात येणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवून तो हॉस्पिटलमध्ये वापरण्यात यावा, अशी सूचना पदाधिकाऱ्यांनी केली.

हेही वाचा: कामाच्या ठिकाणाजवळ कामगारांच्या लसीकरणास भोसरीमध्ये प्रारंभ

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले....

सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन निर्णय घेत आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी वापरण्यात येणारा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात येईल. राज्यातील इतर जिल्ह्यातून ऑक्सिजनची मागणी वाढल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील महापालिका व खाजगी रुग्णालयांमधील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असून काळजी करण्याची गरज नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

loading image