

Scholarship Application Process Suspended Unexpectedly
Sakal
पिंपरी : ‘सारथी’ अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था यांच्यामार्फत ही मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. आता यंदाचे वर्ष संपत आले, तरी या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. परंतु, शासनाने अचानक शिष्यवृत्तीची प्रक्रिया थांबवल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा, कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेअंतर्गत दरवर्षी ३०० विद्यार्थ्यांना देशातील महत्त्वाच्या २०० उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणासाठी साहाय्य दिले जाते. मात्र, मागील वर्षी अर्ज संख्या ५८० होती.