esakal | खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाल्याचा राग काढला मृत तरुणाच्या आई-वडिलांवर
sakal

बोलून बातमी शोधा

खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाल्याचा राग काढला मृत तरुणाच्या आई-वडिलांवर

खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाल्याच्या रागातून मृत तरुणाच्या आई-वडिलांना आरोपींनी बेदम मारहाण केली.

खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाल्याचा राग काढला मृत तरुणाच्या आई-वडिलांवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाल्याच्या रागातून मृत तरुणाच्या आई-वडिलांना आरोपींनी बेदम मारहाण केली. हा प्रकार चिंचवडमधील दळवीनगर येथे घडला. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रामचंद्र कुसाळकर, सुभाष कांबळे (दोघेही रा. दळवीनगर, चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विलास भगुजी कांबळे (वय 52, रा. दळवीनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (ता.9) सकाळी पावणे दहाच्या सुमारास फिर्यादी हे दळवीनगर येथील त्यांच्या मासेविक्रीच्या दुकानावर त्यांच्या पत्नीसह बसलेले होते. त्यावेळी आरोपी त्यांच्या दुकानाजवळ आले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिर्यादीच्या मुलाच्या खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाल्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. यामध्ये आरोपींनी फिर्यादीस दगडाने मारहाण केल्याने त्यांना दुखापत झाली. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.