esakal | पिंपरी-चिंचवड : शहर स्वच्छता स्पर्धेत 15 नोव्हेंबरपर्यंत सहभागी व्हा
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड : शहर स्वच्छता स्पर्धेत 15 नोव्हेंबरपर्यंत सहभागी व्हा

शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2021 जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये चार हजार 41 शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे.

पिंपरी-चिंचवड : शहर स्वच्छता स्पर्धेत 15 नोव्हेंबरपर्यंत सहभागी व्हा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2021 जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये चार हजार 41 शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू आहे, की व्यापक स्वरूपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे व याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे. स्पर्धेमध्ये अर्ज भरण्याची मुदत दिनांक 15 नोव्हेंबरपर्यंत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामधील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ हॉटेल्स, शाळा, हॉस्पिटल्स, गृहनिर्माण संस्था, मोहल्ला मार्केट, मंडई या सहा गटामध्ये स्वच्छता स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये यासाठी 70 गुणांक देण्यात आलेले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्व हॉटेल्स, शाळा, हॉस्पिटल्स, गृहनिर्माण संस्था, मोहल्ला मार्केट, मंडई, शासकीय कार्यालये यांच्याकरीता, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये स्वच्छ पिंपरी-चिंचवड स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे, त्या मोहिमेत समाजातील सर्व घटकांचा समावेश राहणे आवश्‍यक आहे. याकरीता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याबाबतचे निकष निश्‍चित झाले असून वैद्यकीय विभाग, शिक्षण मंडळ व क्षेत्रीय कार्यालय यांनी पाहणी करून निकाल घोषित करण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिलेले आहेत. हॉटेल्स, शाळा, हॉस्पिटल्स, गृहनिर्माण संस्था, मोहल्ला मार्केट, मंडई, शासकीय कार्यालये यांचे परिसर स्वच्छता, शौचालय सुविधा, स्वच्छता साधनांचा वापर, ओला व सुका कचरा, कचरा वर्गीकरण, पायाभुत सुविधा, स्वच्छता ऍप डाउनलोड इत्यादी निकषांचे आधारे गुणांक देण्यात येणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्व हॉटेल्स, शाळा, हॉस्पिटल्स, गृहनिर्माण संस्था, मोहल्ला मार्केट, मंडई, शासकीय कार्यालये यांना कळविण्यात येते, की या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता आपला परिसर स्वच्छता ठेवण्यात यावा, शौचालय साफसफाई- दुरुस्ती व देखभाल करणेत यावी, कचऱ्याचे ओला व सुका कचरा वर्गीकरण करावे, तसेच स्वच्छता बाबत तक्रार करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन SWACHHATA MoUHA ऍप डाउनलोड करून घ्यावे. 


या स्वच्छता स्पर्धेमध्ये उक्त संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. सर्वेक्षणाबाबत अर्ज व इतर माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हॉटेल्स व रुग्णालयाकरीता वैद्यकीय विभाग, शाळांकरिता शिक्षण मंडळ व गृहनिर्माण संस्था, मोहल्ला मार्केट, मंडई, शासकीय कार्यालये याकरिता क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. स्पर्धेमध्ये अर्ज भरण्याची मुदत दिनांक 15 नोव्हेंबरपर्यंत आहे. या स्पर्धेत शहरातील सर्व घटकांनी सहभाग नोंदवुन पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यास महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.