

Pawna Dam Encroachment Removal Operations
Sakal
पवनानगर : पवना धरण परिसरातील अनधिकृत बांधकामांवर पाटबंधारे विभागाने पुन्हा कारवाई सुरू केली आहे. आपटी आणि धामणदरा परिसरातील बंगल्यांवर दुपारी बारा वाजता कारवाईला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात पाच बंगल्यांवर अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात आली. पाटबंधारे विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणे हटवून त्या जमिनी मुक्त करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.