PCMC News: पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी कर्ज रोखे काढणार | Pune news | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC News

PCMC Budget 2023 : पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी कर्ज रोखे काढणार

PCMC News- पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतलेला आहे. या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी कर्ज रोख्याद्वारे (बॉंड) निधी उभारण्यासाठी सरकारने मंजूरी दिली आहे.

सन २०२३-२०२४ या अथिर्क वर्षात ही कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (ता. १४) दिली.

अर्थसंकल्पात पर्यावरण, जलनि:सारण, आरोग्य विभागात काय...

- मुळा नदीवर वाकड पूल ते सांगवी या ८.८० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम एप्रिल २०२३ पासून सुरु

- शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी ५ प्रमुख चौकात ‘मिस्ट टाईप वॉटर फाऊंटन’ उभारणार

- घरगुती धोकादायक कचरा व स्चच्छता विषयक कचऱ्यावर प्रतिदिनी ४ टन प्रक्रीया करण्यासाठी दोन प्रकल्प उभारण्याचे नियोजन

- झोपडपट्टी स्वच्छ करण्यासाठी शून्य कचरा झोपडपट्टी मॉडेल सुरु करणार

- महिला बचत गटांना कचरा संकलनाची जबाबदारी

- महिला बचत गटांना उपजिविकेचे साधन निर्माण करणे

- महिला बचत गटांना दरमहा अर्थिक मोबदला दिला जाणार

- यांत्रिकी मॅन्युअल कचरा कम्पोस्टिंग मशीन उपलब्ध करणार

- ‘नवी दिशा’ महिला गटांना स्वच्छतागृह नूतणीकरणासाठी निधी दिला जाणार

- ‘नवी दिशा’ अंतर्गत महिलांना सामुदायिक शौचालय चालविण्यासाठी आवश्‍यक वस्तू देणार

- उर्जेचा पर्यायी स्तोत्र वाढविण्यासाठी मोशीत ७०० टीपीडी क्षमतचे १४ एमडब्लु वीज निर्मितीचा ‘डब्ल्युटीइ’ प्रकल्प मे पासून सुरु

- शहर आरोग्यदायी होण्यासाठी महापालिकेच्या यांत्रिकी स्विपिंग मशिनद्वारे ६७० किलोमीटर क्षेत्र स्वच्छ होणार

- हॉटेलमधील कचऱ्याचे बायोगॅसमध्ये रुपांतरीत करण्याचा प्रकल्प एप्रिल २०२३ मध्ये कार्यान्वयीत

- मोशीतील १५ लाख मेट्रीक टन कचऱ्याचे ढिग (बायोमायनिंग) संपविणार

- ‘अमृत १.०’ योजने अंतर्गत पिंपळे निलख येथे १२ एमएलडी, बोपखेल येथे ५ एमएलडी, चिखली येथे १२ एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रकीया केंद्राचे बांधकाम प्रगतीपथावर

- ‘अमृत २.०’ योजने अंतर्गत भोसरी-दिघी परिसरात ४५ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रकीया प्रकल्प प्रस्तावित