pcmc election
पिंपरी - महापालिका निवडणुकीसाठी ‘जिंकून येण्याची क्षमता असलेला आपला’, अशी ‘खेळी’ खेळत भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ सुरू केले आहे. परिणामी, भाजपतील इच्छुक अस्वस्थ असून, अंतर्गत कलहही वाढला आहे. या नाराजीतून बाहेर पडलेले राष्ट्रवादीत गेले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे.