
PCMC Election
Sakal
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. ३२ पैकी तीन प्रभागांत थोडा बदल असून, २९ प्रभागांची रचना २०१७ च्या आणि आताच्या प्रारूप प्रभाग रचनेप्रमाणेच आहे. इच्छुकांनी यापूर्वी केलेली तयारी पूर्णत्वास आली असून, आता धाकधूक आरक्षित जागांची आहे. अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) कोणत्या प्रभागात कोणत्या जागेसाठी आरक्षण पडणार, याची प्रतीक्षा सर्वांना आहे.