
Sanjay Gandhi Scheme
Sakal
प्रदीप लोखंडे
पिंपरी : घरात कमवणारा व्यक्ती नसलेल्या निराधार नागरिक तसेच ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठांसाठी सुरू असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या शहरातील हजारो लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक लाभार्थ्यास दीड हजार रुपयांऐवजी आता अडीच हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. वाढीव अनुदानाचा चार हजार २०८ लाभार्थ्यांना फायदा होणार आहे.