
PCMC News
Sakal
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर चिखल होत असल्याने वाहनचालक आणि त्यातही दुचाकीस्वारांना वाहने चालविणे तर पादचाऱ्यांना चालणे जिकिरीचे होत आहे. प्रामुख्याने बांधकाम साहित्याची ने-आण करणाऱ्या वाहनांमुळे हा चिखल पसरत आहे. यासाठी ठोस गंभीर कारवाई करणे अपेक्षित असलेली महापालिका थंडच आहे. पालिका केवळ दंड ठोठावत असल्याने निसरड्या रस्त्यांवरील चिखलात खंड पडत नसल्याचे धोकादायक चित्र अनेक ठिकाणी दिसते आहे.