PCMC Update : वाकड, किवळेतील डीपी रस्त्यांना मुहूर्त, महापालिकेचे कामांना प्राधान्य; जुन्या रस्त्यांचे रुंदीकरणही सुरू
Wakad Development : पिंपरी-चिंचवड महापालिकेने वाकड, रावेत, ताथवडे, किवळे व पुनावळे परिसरात सुमारे ३४ किमी रस्त्यांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली असून ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
पिंपरी : उद्योगनगरीच्या पश्चिम पट्ट्यातील वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी परिसराच्या विकास आराखड्यातील (डीपी) नवीन रस्त्यांची निर्मितीस मुहूर्त लागला आहे. शिवाय या भागांतील प्रस्तावित रस्त्यांच्या रुंदीकरणासही प्राधान्य दिले जात आहे.