राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

anna bansode
anna bansode

पिंपरी : पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाजवळ गोळीबार झाला. ही घटना बुधवारी (ता.१२) दुपारी एकच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली. आरोपीने पिस्तूलातून गोळ्या झाडल्या असून यामध्ये कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

चिंचवड स्टेशन येथे आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एकच्या सुमारास पिस्तूलातून गोळीबार केला. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

anna bansode
मदत राज्य सरकारची, पोस्टर भाजपचे; राष्ट्रवादी कॉंग्रेसची टीका

याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त केले आहे. गोळीबार का केला, आरोपीकडे शस्त्र कुठून आले , याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com