आरोग्य जनतेचं सांभाळायचं की स्वत:चं? पोलिसांसमोर प्रश्न

सध्या बेड, ऑक्सिजन, इंजेक्शनचा तुटवडा आहे. जवळची माणसे सोडून जात आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी प्रत्येकजण काळजी घेत आहे.
pune police
pune police

पिंपरी - सध्या बेड, ऑक्सिजन, इंजेक्शनचा तुटवडा आहे. जवळची माणसे सोडून जात आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी प्रत्येकजण काळजी घेत आहे. विनाकारण घराबाहेर पडत नाही. स्वतःच्या सुरक्षिततेकडे लक्ष देत आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिस मात्र, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्यावर हजर आहेत. यामध्ये स्वतःचे आरोग्य सांभाळायचे की जनतेचे, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केली असून, त्याची काटेकोर अंमलबजावणीसाठी ठिकठिकाणी पोलिस तैनात आहेत. एकीकडे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिसही मोठ्याप्रमाणात बाधित होत आहेत. नाकाबंदी, गस्त, ठिकठिकाणचा बंदोबस्त, दैनंदिन कामकाज यामुळे नागरिकांशी संपर्क येत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. मात्र, तरीही पोलिस ड्यूटीवर हजर आहेत. अगोदरच पिंपरी पोलिस आयुक्तालयात मनुष्यबळाची कमतरता असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. अशातच कर्मचारी पॉझिटिव्ह सापडत असल्याने आणखीनच नियोजन कोलमडत आहे. कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. सध्या केवळ तीन हजार १४० इतकेच मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यातही सुटी, रजा यामुळे आणखीनच कमी मनुष्यबळ उरते. यावरच कामकाज करावे लागत आहे.

pune police
‘अतिरिक्त आयुक्त पवारांना का हटविले?’

कोरोनाच्या या संकटात अद्यापपर्यंत आयुक्तालयातील ७५० पोलिस कोरोनाबाधित झाले. यापैकी ६५५ जण कोरोनातून बरे झाले, तर सध्या ९१ जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच, चार कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तालयातून कोरोना हद्दपार झाला होता. यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा अनेक पोलिस बाधित झाले. सध्या तब्बल ९१ पोलिस कोरोनाचा सामना करीत आहेत.

pune police
बेड नसल्याने ऑक्सिजन लावून जमिनीवर झोपलेत रूग्ण; पिंपरीत आरोग्यव्यवस्थेची दैना!

लसीकरणानंतही लागण

पोलिस आयुक्तालयातील एकूण तीन हजार १४० पोलिसांपैकी दोन हजार ६२६ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस, तर एक हजार २२५ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दुसरा डोस घेतल्यानंतरही काहीजण कोरोनाबाधित झाले आहेत.

लसीकरणाची माहिती

अधिकारी कर्मचारी

एकूण २८४ २८५६

पहिला डोस २२१ २४०७

दुसरा डोस ११० १११५

आयुक्तालयातील सद्यःस्थिती

कोरोनाबाधित अधिकारी -१६

कोरोनाबाधित कर्मचारी -७५

कोरोनामुक्त अधिकारी -९५

कोरोनामुक्त कर्मचारी -५६०

मृत्यू -४

एकूण - ७५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com