
पिंपळे गुरव : काटेपुरम चौकात गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वडाचे मोठे अचानक कोसळले. यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले, तर एका कारचे मोठे नुकसान झाले. पदपथावरील झाड अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यावेळी रस्त्यावरून जाणारे दुचाकीस्वार भिसे यांच्या कुटुंबातील एक महिला व एक पुरुष जखमी झाला. मधुकर तुपे यांच्या कारचे मोठे नुकसान झाले.