
पिंपळे सौदागर : पिंपळे सौदागर परिसरातील पी. के. चौक सध्या अपघातप्रवण ठिकाण ठरत आहे. वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या वेळा (टायमिंग) जास्त असल्याने वाहनचालक वारंवार सिग्नल तोडताना दिसतात. वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणाने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.