लाखोंचा खर्च करूनही पिंपळे सौदागरच्या भाजी मंडईचा वापर नाही

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

पिंपळे सौदागर मंडईतील गाळ्यांचे वाटप करून ती सुरू केल्यास नागरिकांचा वेळ वाचणार आहे.

पिंपळे सौदागर (पिंपरी-चिंचवड) : पवना नदीपात्रालगत दत्त मंदिराशेजारी पाच वर्षांपूर्वी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे भाजी मंडई बांधण्यात आली. मात्र, वापराअभावी ती धूळखात पडून असून, लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. मंडईच्या छताची पत्रे कुजत आहेत. त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. मात्र, मंडईअभावी भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांना पिंपरी मंडईत जावे लागत आहे. हे अंतर साधारणतः पाच किलोमीटर आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपळे सौदागर मंडईतील गाळ्यांचे वाटप करून ती सुरू केल्यास नागरिकांचा वेळ वाचणार असून, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सध्या काही विक्रेत्यांनी रस्ते व पदपथांवर दुकाने थाटली आहेत. त्यामुळे वाहतूक व पादचाऱ्यांना अडथळा ठरत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचेही याकडे दुर्लक्ष झालेले आहे. विशेष म्हणजे या भागाचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झालेला आहे. तरीही सुविधा नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हिंजवडी आयटी पार्कमुळे वेगाने विकसित झालेला आणि स्मार्ट सिटीत समाविष्ट असलेल्या या भागाचे सुनियोजित नागरीकरण, तसेच सामाजिक, धार्मिक सलोखा जपणारे आहे. त्यामुळे शहराच्या इतर भागापेक्षा या भागातील घरभाडे जास्त आहे. तरीही नागरिक राहण्यासाठी या भागाला जास्त पसंती देत आहेत. त्यामुळे येथील दुकानासमोरील मोकळ्या जागेत बसून टपरीवजा जागेचे दिवसाला किमान शंभर ते दोनशे रुपये भाडे देऊन भाजीपाला व फळविक्रेते बसतात. दरम्यान, सरासरी किमान तीन ते सहा हजार रुपये मासिक भाडे मिळवून देणारे अंदाजे पंधरा ते वीस गाळे वाटप न करता लाखो रुपयांचा महसूल बुडविला असून, याची जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimple saudagar's vegetable market is not in used