esakal | पिंपरी : बारा वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

sucied

पिंपरी : बारा वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पिंपरी : बारा वर्षीय मुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरीत (Pimpari) गुरुवारी (ता.१५) सकाळच्या सुमारास घडली. तो पिंपरीतील विठ्ठल नगर येथील रहिवासी होता. (Pimpri 12 year old boy suicide strangulation)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेला अल्पवयीन मुलगा आपल्या मित्रांसोबत गुरुवारी सकाळी पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियम जवळील मैदानात खेळण्यासाठी गेला होता. दुपारी साडेबाराच्या दरम्यान तो साडीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती त्याच्या मित्रांनी कुटुंबीयांना कळवली. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत त्यास खाली उतरून तात्काळ महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा: पुणे : फेसबुकद्वारे ओळख झालेल्या तरुणाकडून महिलेवर बलात्कार

मात्र, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, हा अल्पवयीन मुलगा मामाकडे शिकण्यासाठी होता. पण सध्या ऑनलाईन शाळा असल्याने तो काही दिवसांपूर्वी आपल्या आई - वडिलांकडे पिंपरीत आलेला. याप्रकरणाचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

loading image