esakal | पुणे : फेसबुकद्वारे ओळख झालेल्या तरुणाकडून महिलेवर बलात्कार
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

पुणे : फेसबुकद्वारे ओळख झालेल्या तरुणाकडून महिलेवर बलात्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - फेसबुकद्वारे ओळख झालेल्या तरुणाने विवाहीत महिलेवर बलात्कार करून, ते व्हिडीओ चित्रीकरण व छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडे तब्बल एक कोटी रुपयांची मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौरभ सुभाषचंद्र सुखिजा (वय 34, रा. पटियाला, पंजाब) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची 2019 मध्ये सुखिजा याच्यासमवेत फेसबुक मेसेंजरद्वारे ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात संवाद वाढला. काही दिवसांनी सुखिजा हा फिर्यादीला भेटण्यासाठी खास पटीयालाहून पुण्यात आला होता. फिर्यादीच्या सदनिकेमध्येच त्याने फिर्यादीस सरबतामधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर महिलेवर बलात्कार केला.

हेही वाचा: पुणे रेल्वे स्थानकावरील सरकता जिना नामशेष !

दरम्यान, त्याने व्हिडीओ चित्रीकरण तसेच छायाचित्रेही काढून ठेवले होते. त्यावेळी त्याने फिर्यादीचे मंगळसूत्रही काढून घेतले होते. दरम्यान, त्याने संबंधीत छायाचित्र व व्हिडीओ चित्रीकरण त्याच्या व्हॉटस्‌अप स्टेटसला ठेवले होते. त्यानंतर त्याने फिर्यादीचे मंगळसूत्र, त्याने काढलेली छायाचित्रे व व्हिडीओ चित्रीकरण फिर्यादीस परत करण्याच्या बदल्यात फिर्यादीकडे एक कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यासाठी तो फिर्यादीस सातत्याने फोन, मेसेज व व्हिडीओ कॉल करून धमकी देत होता. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड करत आहेत.

अशी घ्या काळजी

- फेसबुकवर अनोळखी व्यक्तींच्या "फ्रेंड रिक्वेस्ट' स्विकारू नका

- फेसबुकवर अनोळखी व्यक्तींशी मैत्री वाढविताना पुरेशी काळजी घ्या

- परिचीत नसलेल्यांशी व्हॉटसअप कॉलींगद्वारे संवाद साधू नका

- सोशल मीडियावर वैयक्तीक व गोपनीय माहिती ठेवण्याचे टाळा

- वैयक्तीक, कुटुंबांचे व्हिडीओ, छायाचित्रे सोशल मीडियावर ठेवू नका

- चुकीचे घडत असल्यास कुटुंबातील व्यक्ती, मित्र-मैत्रीणी किंवा पोलिसांशी संवाद साधा.

इथे करा संपर्क - सायबर पोलिस ठाणे - 020 - 29710097

loading image