पिंपरीत रुग्णांची संख्या साडे नऊशेच्या घरात; मृतांची संख्याही घटली

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 August 2020

अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी तसेच दक्षता घ्यावी. 

Pimpri Corona Updates: पिंपरी : शहरात सोमवारी (ता.१०) ९४४ जण पाॅझिटीव्ह आढळले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ३० हजार ५२५ झाली आहे. तसेच एक हजार ४८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत २१ हजार ११८ जण बरे झाले आहेत. सध्या आठ हजार ९१४ जणांवर उपचार सुरू आहेत. तर दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ४९३ झाली आहे.

ना बेड्सची चिंता, ना रुग्णवाहिकेची; कोथरूडमधील सोसायट्यांनी उभारलं स्वत:चं क्वॉरंटाइन सेंटर!​

आज मयत झालेल्या व्यक्ती पिंपरी (स्त्री वय ८०), इंद्रायणीनगर (पुरूष वय ५०), दिघीरोड, भोसरी (पुरूष वय ७८), पिंपळे गुरव (पुरूष वय ४५), चिंचवडगाव (पुरूष वय ६५), रूपीनगर (पुरूष वय ५२), देहूगाव (पुरूष वय ८०), निगडी (पुरूष वय ७५), चिखली (पुरूष वय ५१), संभाजीनगर (स्त्री वय ४९), रुपीनगर (स्त्री वय ३५), सांगवी (स्त्री वय ६७) येथील रहिवासी आहेत.

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकीय विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत (PCMC) सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क (Mask) ओला होणार नाही याची काळजी तसेच दक्षता घ्यावी, यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

- पुणे जिल्ह्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pimpri 944 people tested Corona positive on Monday 10th August 2020