आमची हद्द कोणती रे भाऊ!;नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीमुळे हद्दीचा घोळ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 February 2021

पंधरा दिवसांपूर्वी अनिल मेहता यांना नाशिकहून आलेल्या तिघांनी बांबूने मारहाण केली होती. आर्थिक गैरव्यवहाराबाबत नाशिक पोलिस आयुक्तांकडे तक्रार केल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला होता.

पिंपरी - ‘अरे! इथे नाला कुठंय?’ पोलिसाच्या प्रश्‍नावर चहाच्या टपरीवर उभ्या असलेल्या तरुणाने उत्तर दिले, ‘हा काय.’ हा संवाद घडलाय, पुणे-मुंबई महामार्गावर मोरवाडी चौक ते चिंचवड स्टेशन दरम्यानच्या एका नाल्याकाठच्या चहाच्या टपरीजवळ. कारण, नाशिकहून आलेल्या तिघांनी एकाला जबर मारहाण केली होती. फिर्याद चिंचवड पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यांनी, ‘आमची हद्द नाही’, म्हणून पिंपरी पोलिस ठाण्याकडे गुन्हा वर्ग केला. चौकशीसाठी आलेल्या पोलिसांना ‘तो’ नाला सापडत नव्हता. कारण, महामार्गाचे रुंदीकरण झाले आहे. नाल्याच्या दोन्ही बाजूला टोलेजंग व्यापारी संकुल उभारले आहेत. शिवाय, पोलिस ठाण्याची हद्द दर्शवणारा फलक या ठिकाणी नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंधरा दिवसांपूर्वी अनिल मेहता यांना नाशिकहून आलेल्या तिघांनी बांबूने मारहाण केली होती. आर्थिक गैरव्यवहाराबाबत नाशिक पोलिस आयुक्तांकडे तक्रार केल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला होता. मात्र, घटना घडली तो पुणे-मुंबई महामार्गावरील नाला आता दिसत नाही. कारण, महामार्गाचे रुंदीकरण झाले आहे. एका बाजूला नाल्यावर स्लॅब टाकून छोटेछोटे शॉप्स उभारले आहेत. दुसऱ्या बाजूला नाल्याला संरक्षक भिंत बांधून व्यापारी संकुले झाली आहेत. त्यामुळे नाला दिसतच नाही. विशेष म्हणजे या नाल्याजवळ पिंपरी, चिंचवड ही पोलिस ठाणे आणि चार पोलिस चौक्‍यांची हद्द आहे. या चौक्‍यांमध्ये पिंपरी पोलिस ठाण्यांतर्गत मोहननगर, संत तुकारामनगर, पिंपरी आणि चिंचवड पोलिस ठाण्यांतर्गत चिंचवड चौकीचा समावेश आहे. मात्र, घटना घडली तो परिसर चिंचवड स्टेशन म्हणून ओळखला जात असल्याने तक्रारदार चिंचवड पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी गुन्हा नोंद करून पिंपरी ठाण्याकडे वर्ग केला आणि ‘त्या’ नाल्याचा शोध सुरू झाला. अखेर तो सापडला आणि गुन्ह्याचा तपास सुरू झाला. पिंपरी व चिंचवड पोलिस ठाण्यांप्रमाणेच शहरातील अन्य ठाणे व चौक्‍यांच्या हद्दींबाबतसुद्धा अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तक्रारदारांचा गोंधळ होत आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथे होतो गोंधळ

  • चिंचवड स्टेशन येथे महामार्गालगत पिंपरी पोलिस ठाणे आहे. त्याच्या समोरील बाजूस रेल्वे स्टेशन व दवाबाजार हा भाग निगडी व आनंदनगर भाग चिंचवड पोलिस ठाण्यात येतो. 
  • आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या उत्तरेकडील भाग निगडी ठाणे, डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज परिसरातील काही भाग देहूरोड व काही भाग चिंचवड ठाण्याच्या हद्दीत आहे. 
  • थरमॅक्‍स चौकाजवळ निगडी, चिखली व पिंपरी पोलिस ठाण्यांची हद्द आहे. 
  • ज्योतिबानगर तळवडे येथे देहूरोड व चिखली ठाण्यांची हद्द आहे.
  • औद्योगिक परिसरामुळे अनेक लहान रस्ते आहेत. त्यामुळे भोसरी व भोसरी एमआयडीसी ठाण्याची हद्द कळत नाही

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri and Chinchwad police stations boundaries issue