पिंपरी : टाक्यांच्या परिसरात सुरक्षा रक्षक नेमवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water tank

पिंपरी : टाक्यांच्या परिसरात सुरक्षा रक्षक नेमवा

मोशी : बोऱ्हाडेवाडी व मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक सहामध्ये महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांच्या आवारात सुमारे अडीच महिन्यांपासून एकही सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे तेथील विविध वस्तूंच्या सुरक्षिततेबरोबरच नागरिकांच्याही आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्‍वर बोऱ्हाडे म्हणाले, ‘‘महापालिकेने दिलेले टेंडर व ठेकेदाराकडून मिळालेल्या माहितीवरून, महापालिकेमार्फत कोविड उपचारासाठी फंड जमा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षारक्षक कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे सांगितले आहे. पण, एकाच ठिकाणावरील सर्व सुरक्षारक्षक काढून टाकणे चुकीचे आहे.

हेही वाचा: बहिण-भावाची शेवटी भेट झालीच नाही!

जेथे तीन सुरक्षारक्षक असतील तेथे दोन, जेथे दोन असतील तेथे एक अशाप्रकारे नियोजन करावे. परंतु, तसे न करता सगळे सुरक्षारक्षक काढून टाकल्याने येथील सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.’’ दरम्यान, याठिकाणी चोरी किंवा टाकीवर चढून आत्महत्येसारखा दुसरा अपघात होऊ नये, यासाठी सुरक्षारक्षकांची गरज आहे.

हेही वाचा: अखेर ; पिंपळ्यातील अतिक्रमण जिल्हाधिकाऱयांनी हटविले

त्यामुळेच येथे सुरक्षारक्षक ठेवले होते. आता येथील जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे ठेकेदाराला सूचना करून सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी प्रवीण बोऱ्हाडे, संतोष सस्ते, रोहित हजारे, तुषार बोऱ्हाडे, पूजा बोऱ्हाडे आदींनी केली आहे.

कोविडमुळे महापालिकेवर आर्थिक भार आहे. त्यामुळे सध्या इतर गरजेची नसलेली कामे कमी करावे. पाण्याच्या टाकीवरील सुरक्षतेची जबाबदारी ही तितकीच महत्त्वाची आहे. याठिकाणी व्यवस्थित नियोजन करून पुन्हा सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी.

Web Title: Pimpri Appoint Security Guards In The Vicinity Of

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PimpriPune News