पिंपळ्यातील अतिक्रमण जिल्हाधिकाऱयांनी अखेर हटविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

अखेर ; पिंपळ्यातील अतिक्रमण जिल्हाधिकाऱयांनी हटविले

पिंपळे-जगताप : येथील पुनर्वसित शेतक-यांना (Farmers) दिलेल्या प्लॉटमधील अतिक्रमण अखेर जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांच्या आदेशानुसार तहसिलदार लैला शेख यांनी बुधवारी (Wednesday) हटविले. शिक्रापूर (Shikrapur) पोलिसांच्या मोठ्या ताफ्याच्या उपस्थितीत ही कारवाई तब्बल तीन तास सुरू होती. दरम्यान अतिक्रमण केलेल्या कुटुंबांनी (Family) अतिक्रमण पाडण्याला प्रतिबंध (Restrictions) करताना आत्महत्येचा इशारा दिला आणि उच्च न्यायालयात (High Court) याचिकाही दाखल केल्याची माहिती चंदन सोंडेकर यांनी दिली.

पिंपळे-जगताप येथील गायरान गट नंबर ४२०/२ मध्ये चासकमान प्रकल्पग्रस्त ज्ञानेश्वर पिंगळे व तुकाराम गुरव यांना घरांसाठी प्लॉट क्र.१५ ते १८ दिले होते. मात्र या ठिकाणी वेताळ कुटुंबीयांचे अतिक्रमण असल्याने त्याबाबत गुरव व पिंगळे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्यावर जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना पिंपळ्यात प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते तर कारवाई काय करणार याबाबतही विचारणा केली होती. त्यानुसार डॉ.देशमुख यांनी येत्या २० तारखेच्या सुनावणीत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या अनुषंगाने तहसिलदार लैला शेख यांना आदेश देवून वरील गटातील अतिक्रमणाची कारवाई केली.

हेही वाचा: BREAKING : कंगना रानौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; वांद्रे न्यायालयाने दिले होते आदेश

शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस बंदोबस्तात दुपारी एकच्या सुमारास सुरू झालेली कारवाई जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली. यावेळी वेताळ कुटुंबीयांचे वतीने अतिक्रमण काढल्यास आत्त्महतेचा इशाराही देण्यात आला. अखेर सुमारे तीन तासाच्या कारवाईत वेताळ यांचे राहते घराव्यतिरिक्त इतर सर्व अतिक्रमण काढण्यात आले.

हेही वाचा: मोठी घडामोड, हेमंत नगराळेंकडून मुंबई पोलिस दलात मोठा बदल

गट क्र.४२०/२ मध्ये सन १९८८ पासून अनेकजण राहतात. मात्र चासकमान प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठाण लेआऊट स्थळपाहणी न करता मंजुर केल्याने वेताळांसारख्या भटक्या-विमुक्त भूमिहिनांवर कारवाई झाली आहे. याबाबत यापूर्वीचे शासनाचे अतिक्रमण नियमितीकरणाचे अनेक अध्यादेश व झालेली कारवाईतील त्रुटी घेवून आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी २५ तारखेला आहे. शिवाय गुरव व पिंगळ्यांच्या केसमधील सुनावणी २० तारखेला असून त्यावरही आम्ही लक्ष ठेवून असून त्यानंतर आमच्यावरील अन्यायाबाबत आम्ही योग्य तो लढा देणार असल्याची माहिती वेताळांचे वतीने चंदन सोंडेकर यांनी दिली.

टॅग्स :pune