esakal | Bhosari विधानसभा मतदारसंघात ४ कोटीच्या विकासकामांना मंजुरी:
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Amol Kolhe

भोसरी विधानसभा मतदारसंघात ४ कोटीच्या विकासकामांना मंजुरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : राज्याच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदारसंघात विशेष निधी अंतर्गत ४ कोटी रकमेच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. येत्या काही दिवसांत या कामांना सुरुवात होईल, असे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कळविले आहे.

कोविडमुळे केंद्र सरकारने २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन वर्षांचा खासदार निधी अन्यत्र वळविला. मात्र खासदार निधीतून कामे करण्यात अडचणींवर मात करून डॉ. कोल्हे यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांतून निधी मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांना विनंती केली. त्यानुसार नगरविकास विभागाच्या 'महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधाच्या विकासासाठी विशेष तरतूद' या शिर्षांतर्गत भोसरी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी चार कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा: सांगोला : रतनकाकी प्रथमच राजकीय व्यासपीठावर

या सर्व कामांची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे सांगून खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, कोविडमुळे निधी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी ग्रामीण व शहरी या दोन्ही भागांत कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्यात आपल्याला यश मिळाले. त्यामुळेच जिल्हा नियोजन, नगरविकाससह विविध माध्यमातून मोठा निधी मिळू शकला.

loading image
go to top