
पिंपरी : भोसरी ते घोडेगाव PMPML बससेवेचा मुहूर्त
घोडेगाव : घोडेगाव हे आता पिंपरी-चिंचवड शहराला बस द्वारे जोडले गेले आहे. भोसरी ते घोडेगाव व घोडेगाव ते मंचर अशी पी एम पी एम एल बस सेवा आज सुरु करण्यात आली. एसटी संपाच्या काळात या बसद्वारे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
घोडेगाव शहरामध्ये पीएमपीएमएलच्या बसचे आगमन होताच घोडेगाव ग्रामस्थांनी बसची घोडेगाव परीसरातून ढोल-ताशांच्या आवाजात, फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढली. तसेच पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला. याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे, पंचायत समिती सदस्या अलका घोडेकर, सरपंच क्रांती गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे,जयसिंग काळे, शाम होनराव, ज्ञानेश्वर घोडेकर, सोमनाथ काळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, जयसिंगराव एरंडे, राजेश काळे, विजय पवार, भानुदास काळे, तुकाराम काळे, प्रशांत काळे, उल्हास काळे, मनसेचे संतोश बो-हाडे, संतोश काळे, स्वप्निल घोडेकर, गणेश घोडेकर, रूपाली झोडगे, रत्ना गाडे, आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. पीएमपीएमएल भोसरी डेपोचे सुनिल चव्हाण, कुंदन काळे, दिपक ओव्हाळ, अस्लम तांबोळी, दिपक गायकवाड, निलेश शेलार, राजेश नायकोडी, दिपक सुर्यवंशी, आदि उपस्थित होते.
हेही वाचा: धक्कादायक : मयत व्यक्तीच्या खात्यातील साडेचार लाख लंपास; गुन्हा दाखल
दरम्यान भोसरी ते घोडेगाव व घोडेगाव ते मंचर या मार्गावर पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेल्या बसला आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अॅड. नितीन लांडगे यांनी भोसरीतील बीआरटीएस टर्मिनलमध्ये उद्घाटन करून बस सुरू केली.भोसरी पर्यंत तिकिट दर जेष्ठ नागरिक ४० रुपये तर एक दिवसाचा पास ७० रुपये आहे.भोसरी ते घोडेगाव दिवसभरात सहा फेऱ्या होणार आहे.
Web Title: Pimpri Bhosari Ghodegaon Pmpml Bus Service Start
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..