esakal | स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड देशात 41 वे, राज्यात चौथे स्थान प्राप्त
sakal

बोलून बातमी शोधा

स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड देशात 41 वे, राज्यात चौथे स्थान प्राप्त

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतअंतर्गत सुरू असलेल्या विकामकामांच्या आधारावर देशभर सर्व्हे करण्यात आला.

स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड देशात 41 वे, राज्यात चौथे स्थान प्राप्त

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांच्या आधारावर देशभर सर्व्हे करण्यात आला. त्यात पिंपरी-चिंचवड शहराने राज्यात चौथे आणि देशात 41 वे स्थान प्राप्त केले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू झाली असल्याचे दिसते आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजना पाच वर्षांपूर्वी सुरू केली. योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश करण्यात आला. त्यासाठी संपूर्ण पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव, रहाटणी, वाकड या गावांच्या काही भागाचा समावेश करण्यात आला. त्याअंतर्गत अनेक कामे सुरू आहेत. यासाठी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनी स्थापन केली आहे. तिचे मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा केंद्र सरकारने आढावा घेऊन गुणांकन केले आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियेपासून ते स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीपर्यंत सर्व बाबींची पडताळणी करण्यात आली. त्यात मिळालेल्या गुणांकानुसार देशातील स्मार्ट सिटींमधील स्थान निश्‍चित करण्यात आले. यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहर 49 व्या क्रमांकावर होते. ते आता 41 व्या क्रमांकावर पोचले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्मार्ट सिटी प्रकल्पांअतर्गत काढण्यात आलेल्या निविदा, मार्किंग, प्रकल्पांतर्गत रस्ते आणि गृहनिर्माण प्रक्रिया यानुसार गुणांकन देण्यात आले. त्या गुणांकानुसार शहरांची यादी करण्यात आली. ती यादी केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने प्रसिद्ध केली. त्यात पिंपरी-चिंचवडचा समावेश राज्यात चौथ्या, तर देशात 41 व्या स्थानावर आहे. 

पिंपरी-चिंचवडमधील पथारीवाल्यांचे सर्वेक्षण नोव्हेंबरमध्ये; खासगी संस्थेची नियुक्ती

स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, "स्मार्ट सिटी प्रकल्प निविदा किती काढल्या, काम सुरू करण्याचे आदेश किती दिले. किती प्रकल्प पूर्ण झाले. यानुसार गुणांकन काढले आहे. स्मार्ट सिटी योजनेत शहराचा उशिरा समावेश झाल्याने कामे उशिरा झाली. तरीही देशात 41 वे स्थान मिळविले, ही चांगली सुधारणा आहे. शंभर टक्के निविदा प्रक्रिया केली आहे. कामाचे आदेश दिलेले आहेत. स्मार्ट सिटीचे अनेक प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण होतील आणि आणखी गुणांकन वाढेल, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.''