esakal | पिंपरी : तरुणाचे अपहरण; गळ्याला चाकू लावून लुटली रोकड
sakal

बोलून बातमी शोधा

Kidnaping

पिंपरी : तरुणाचे अपहरण; गळ्याला चाकू लावून लुटली रोकड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : भोसरीतील (bhosari) जुन्या पीसीएमटी बस थांब्यावरून तिघांनी एका तरुणाचे मोटारीतून अपहरण केले. मोटारीत तरुणाला मारहाण करीत व गळ्याला चाकू लावून तरुणाकडील रोकड लुटली. त्यानंतर तरुणाला आरोपींनी कुदळवाडी येथील उड्डाणपुलाखाली सोडले. हा प्रकार सोमवारी (ता. ६) मध्यरात्री एकच्या सुमारास घडला.

याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे पूजापाठ करण्याचे काम करतात. रविवारी (ता. ५) रात्री अकरा वाजता पूजेला जाण्यासाठी ते भोसरीतील जुना पीसीएमटी बस थांबा येथे गाडी शोधण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्याजवळ एक मोटार आली. त्यातील एकाने फिर्यादीला पाठीमागून धक्का देत मोटारीत ढकलले. मोटारीत जबरदस्तीने बसवून बेदम मारहाण करीत त्यांच्या खिशातून एक हजार रुपये काढून घेतले.

हेही वाचा: मोदी सरकारविरोधात RSSच्या संघटना उतरणार रस्त्यावर

त्यानंतर फिर्यादी यांचे डोळे बांधून त्यांना निगडी भागात घेऊन गेले. पुन्हा मारहाण करीत गळ्याला चाकू लावून मारण्याची भीती घालत जबरदस्तीने फोन पे वरून ऑनलाईन दहा हजार रुपये पाठवण्यास सांगितले. फिर्यादी यांनी पाठवलेले पैसे आरोपींनी काढून घेतल्यानंतर त्यांना कुदळवाडी येथील पुलाच्या खाली सोडून दिले. दरम्यान, पोलिसात तक्रार दिल्यास फिर्यादी यांच्या आई-वडिलांना मारण्याची आरोपींनी धमकी दिली. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top