
PCMC Budget 2026
Sakal
पिंपरी : महापालिकेचा वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ उपक्रम प्रशासन राबवीत आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आत्तापर्यंत दोन हजार ७०० पेक्षा जास्त नागरिकांचे अभिप्राय नोंदविले आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी १५ सप्टेंबर २०२५ ही अंतिम मुदत आहे.