पिंपरी चिंचवड : उद्योगनगरीला केंद्राचे एक कोटीचे बक्षीस

केंद्र सरकारच्या ‘सायकल फोर चेंज चॅलेंज’ उपक्रमात पिंपरी-चिंचवड शहराची देशातील ११० शहरांमध्ये सातवा क्रमांक आला.
PCMC
PCMCSakal

पिंपरी - केंद्र सरकारच्या (Central Government) ‘सायकल फोर चेंज चॅलेंज’ (Cycle for Change Challenge) उपक्रमात पिंपरी-चिंचवड शहराची (Pimpri Chinchwad City) देशातील ११० शहरांमध्ये सातवा क्रमांक (Seventh Rank) आला. त्यामुळे शहराला एक कोटी रुपयांचे पारितोषिक (Award) प्राप्त झाले आहे. सांगवी फाटा ते साई चौक या मार्गावर उपक्रम राबविला होता. त्यावरील प्रश्नोत्तरे व सादरीकरणाच्या आधारे शहराची निवड झाली, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली. (Pimpri Chinchwad City Centres Prize of Rs One Crore)

महापौर कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, आयुक्त राजेश पाटील आदी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयातर्फे ‘सायकल फोर चेंज चॅलेंज’ उपक्रम राबविण्यात आला. त्यानुसार, सायकल मार्ग तयार करण्यासाठी महापालिकेने वेबसाइट, फेसबुक व सारथी ॲपद्वारे सायकल प्रेमींना आवाहन केले होते.

PCMC
पिंपरी चिंचवडमध्ये शुक्रवारी मिळणार कोव्हिशिल्डचे १३,१०० डोस

१४ ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत त्यांच्याकडून सर्वेक्षण करून अर्ज भरून घेतले. त्यात एक हजार ४५० नागरिकांनी सहभाग घेतला. त्यांच्या मतांचा विचार करून सांगवी फाटा ते साई चौक हा सुमारे चार किलोमीटर लांबीचा प्रारूप सायकल मार्ग दोन्ही दिशेने निश्‍चित केला. प्रत्यक्ष मार्गावर सायकलस्वारांकडून दोन वेळा हॅंडलबार सर्व्हे करून त्यांच्या सूचना व अडचणी जाणून घेतल्या. त्यानुसार सायकल मार्ग तयार केला. राजीव गांधी पूल औंध ते साई चौक (जगताप डेअरी) हा मुख्य प्रारूप सायकल मार्ग आणि सुदर्शन चौक ते कस्पटे चौक हा पाच किलोमीटरचा आणि विशालनगर पिंपळे निलख डीपी रस्ता हा तीन किलोमीटर असे दोन प्रारूपपुरक सायकल मार्ग निश्‍चित केले.

सायक्लोथॉन व वॉकेथॉन

  • १ ऑक्टोबर २०२० - ऑटोक्लस्टर ते काळेवाडी फाटा व परत ऑटोक्लस्टर, ७०० सायकलस्वारांचा सहभाग

  • २० ऑक्टोबर २०२० - सांगवी फाटा- वाय जंक्शन- कस्पटे चौक- काळेवाडी फाटा- सांगवी फाटा, १००० सायकलस्वारांचा सहभाग

  • १७ जानेवारी २०२१ - मार्ग एक - भोसरी गावजत्रा मैदान- जयगणेश साम्राज्य चौक- संतनगर- इंद्रायणी स्वीट कॉर्नर- एमआयडीसी- गावजत्रा मैदान- १० किलोमीटर. मार्ग दोन ः भोसरी गावजत्रा मैदान- जयगणेश साम्राज्य चौक- साने चौक- संतनगर- इंद्रायणी स्वीट कॉर्नर- एमआयडीसी- गावजत्रा मैदान- २५ किलोमीटर, ६००० सायकलस्वारांचा सहभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com