esakal | Pimpri Chinchwad: शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी डॅा. कैलास कदम
sakal

बोलून बातमी शोधा

डॅा. कैलास कदम

Pimpri Chinchwad: शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी डॅा. कैलास कदम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेल्या पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) शहर जिल्हा काँग्रेस (congress) अध्यक्षपदी कामगार नेते व माजी नगरसेवक डॅा. कैलास कदम (kailad kadam) यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे महापालिका (pimpri chinchwad corporation ) आगामी निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढली जाणार हे स्पष्ट झाले.

सचिन साठे यांनी शहराध्यक्ष पदाचा आठ महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता. मात्र, पक्ष नेतृत्वाने तो स्विकारला नव्हता. गेल्या महिन्यात त्यांची प्रदेश चिटणीस पदी वर्णी लागली. त्यामुळे शहर काँग्रेसचा आगामी अध्यक्ष कोण? या बाबत उत्सुकता होती. ती कदम यांच्या नियुक्तीमुळे संपली आहे.

कैलास कदम यांचा परिचय

एका सामन्य कामगराच्या कुंटूबात कैलास कदम यांचा जन्म झाला. पिंपरी येथील एच.ए. स्कूल इंग्रजी माध्यमतून शिक्षण झाले. कदम यांच्या नेतृत्वात १९९७ च्या निवडणुकीत पहिली महिला नगरसेविका बिनविरोध निवडून आणली गेली‌. २००७ च्या पिपंरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत कदम यांच्या वहिनी निर्मला कदम खराडवाडीतून निवडून आल्या. पुढे २०१२ च्या निवडणुकीत स्वतः कैलास कदम व त्यांचे बंधू सद्गुरू कदम निवडून आले.

कैलास कदम यांनी महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेते या व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य या महत्वाच्यां पदावर काम केले, ते इंटक चे पुणे जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांनी कामगार क्षेत्रात अतिशय भरीव काम केले आहे. पगारवाढ करार, अनेक बेरोजगार युवकांना रोजगार देणे, कामगारांना नोकरीत कायम करणे, परदेशात विविध देशांमध्ये कामगार परिषदांना भारताच्या वतीने प्रतिनिधीत्व केले आहे. त्याच बरोबरीने त्यांनी कोकणातील असंख्य बांधवांना एकत्र करून पिपरी चिचंवड शहरामध्ये कोकण विकास महासंघाची स्थापना केली.

एका कामगार नेत्याला काँग्रेस शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देत काँग्रेस नेतृत्वाने या औद्योगिक नगरित कामगार व काँग्रेसचे संयुक्त समीकरण करून कौशल्यपुर्ण निर्णय घेतला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पिंपरी चिचंवड शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या निवडीने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या निवडी बाबत कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार व्यक्त केले आहेत.

loading image
go to top