पिंपरी: अस्वच्छता करणाऱ्यांना ५० हजारांपर्यंत दंड; महापालिकेचा निर्णय

राजेश पाटील यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा झाली. त्यात सार्वजनिक स्वच्छतेविषयक विविध बाबींकरीता निर्धारित केलेल्या दंडाच्या रकमांचे पुनर्निधारण करण्यात आले.
Garbage on Road
Garbage on RoadSakal
Summary

राजेश पाटील यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा झाली. त्यात सार्वजनिक स्वच्छतेविषयक विविध बाबींकरीता निर्धारित केलेल्या दंडाच्या रकमांचे पुनर्निधारण करण्यात आले.

पिंपरी - सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, कचरा जाळणे, उघड्यावर शौच करणे, रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणे, जैव वैद्यकीय घनकचरा सामान्य कचऱ्यामध्ये अथवा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकणे आदी बाबींसाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत महापालिकेने वाढ केली आहे. पाचशे रुपयांपासून पन्नास हजार रुपयांपर्यंत दंडाची रक्कम निश्चित केली आहे.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये प्रशासक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा झाली. त्यात सार्वजनिक स्वच्छतेविषयक विविध बाबींकरीता निर्धारित केलेल्या दंडाच्या रकमांचे पुनर्निधारण करण्यात आले. त्यास पाटील यांनी मंजुरी दिली. सद्यःस्थितीत उघड्यावर कचरा टाकण्यासाठी १८० रुपये दंड आकारण्यात येतो. अनेक भागांमध्ये मोठ्या स्वरूपात कचरा टाकला जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कमी प्रमाणात कचरा टाकणे आणि मोठ्या प्रमाणात कचरा टाकणे या दोन्ही घटनांकरीता दंडाची रक्कम वेगवेगळी केली आहे. नागरिकांना अस्वच्छता करण्यापासून परावृत्त करण्याकरिता दंडाची रक्कम वाढविली आहे. त्याचबरोबर काही नवीन बाबींकरीतादेखील दंडाची रक्कम निर्धारित केली आहे.

...अशी आहे दंडाची रक्कम

रक्कम (रुपयांत) / दंडाचे कारण

  • ५०० / रस्ता अथवा सार्वजनिक ठिकाणी छोट्या प्रमाणात कचरा टाकून अस्वच्छता करणे; उघड्यावर लघुशंका करणे; सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण छोट्या स्टिकर्स लावणे; व्यावसायिक आस्थापनांमार्फत कचरापेटी न ठेवणे

  • १,००० / सार्वजनिक ठिकाणी थुंकणे; उघड्यावर शौच करणे

  • २,००० / मोकळ्या प्लॉटमध्ये अस्वच्छता करणे

  • ३,००० / रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणे

  • ५,००० / सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण मोठे स्टिकर्स लावणे; छोट्या स्वरूपात कचरा जाळणे; ऑनसाईट कंपोस्टींग तथा बल्क वेस्ट जनरेटर करताना प्रथम आढळल्यास

  • १५,००० / ऑनसाइट कंपोस्टींग तथा बल्क वेस्ट जनरेटर करताना दुसऱ्यांदा व त्यापुढील प्रत्येक प्रसंगी

  • २५,००० / मोठ्या स्वरूपात कचरा जाळणे

  • ३५,००० / जैववैद्यकीय घनकचरा सामान्य कचऱ्यामध्ये अथवा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकणे

  • ५०,००० / ट्रक, टेम्पोद्वारे रस्ते अथवा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकणे

प्लास्टिक वापरास ५ ते २५ हजार दंड

बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर केल्यास पहिल्या प्रसंगाकरिता पाच हजार रुपये, दुसऱ्यांदा आढळल्यास १० हजार रुपये, तिसऱ्यांदा आढळल्यास २५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल. घरगुती, व्यावसायिक आणि निर्माणाधीन इमारती, मॉल्स, थिएटर्स, मोठी रुग्णालये या ठिकाणी डासोत्पत्ती स्थानांची निर्मिती केल्यास अनुक्रमे एक हजार, दोन हजार व १० हजार रुपये दंड केला जाईल. मोबाईल टॉयलेट सेवेसाठीच्या शुल्कात वाढ केली आहे. यासाठी आता प्रतिदिन ३०० रुपये आकारण्यात येतील. तीन हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. मैला उपसा सुविधा पुरविण्याच्या रकमेतही वाढ केली आहे. निवासीसाठी दीड हजार रुपये आणि व्यावसायिकसाठी अडीच हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com