महिलांसाठी पिंपरी-चिंचवड शहर सुरक्षित

Pimpri-Chinchwad-City
Pimpri-Chinchwad-City

पिंपरी - इतर शहरांच्या तुलनेने आपले शहर महिलांसाठी सुरक्षित आहे. स्मार्ट आहे. ते आणखी स्मार्ट होण्यासाठी प्रशासन व नागरिक यांच्यात समन्वय असायला हवा, हे प्रातिनिधिक स्वरुपातील मत व्यक्त केले आहे. शहरातील युवतींनी. शहराच्या दीर्घकालीन विकासाचे धोरण अवलंबण्यासाठी आणि ध्येय व दृष्टिकोन ठरविण्यासाठी महापालिकेतर्फे एक सर्व्हे करण्यात आला. ज्यामध्ये नागरिकांना शहराबद्दल वाटणारा आपलेपणा, सहकार्य, विश्‍वास, आवड आणि किमान गरजांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये पंधरा हजार नागरिकांनी सहभाग घेतला. त्यादृष्टीने प्रातिनिधिक स्वरुपात युवतींचे मत जाणून घेतले. 

देशात २०३० पर्यंत सर्वसमावेशक, आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि राहण्यायोग्य शहर बनविण्याचे व दीर्घकालीन विकासाचे धोरण धोरण महापालिकेने आखले आहे. त्याअंतर्गत नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी १३ विषयांवरील ९१ प्रश्‍नांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात आले. शहराचे ध्येय आणि दृष्टिकोन यावर सर्वेक्षणाचा भर होता. त्यातून शहराला आकार देणारे नोकऱ्‍यांचे भवितव्य, खेळ व आरोग्य आणि नद्यांचे अस्तित्व असे तीन घटक पुढे आले आहेत. सिटी ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम (शहर परिवर्तन) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या घटकांवर महापालिकेने महिलांकडून संकल्पना मागविल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नद्यांचे अस्तित्व

  • शहरातून वाहणाऱ्‍या मुळा, पवना व इंद्रायणी नद्यांना प्रदूषण मुक्त करण्यासाठी उपाययोजना
  • नदी प्रदूषणाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी नदी स्वच्छता व जागरूकता अभियान
  • रोज वापरात येणारा प्लास्टिक कचरा कमी करण्यात मदत करण्यासाठी शून्य प्लास्टिक आव्हान
  • नद्यांच्या साफसफाई व देखभालीसाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता अभियान
  • जलसंधारण उपक्रमांद्वारे नद्यांचे व इतर जलसंपत्तीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रकल्प

परिवर्तनाचे घटक
नोकऱ्‍यांचे भवितव्य

  • संशोधन आणि विकासाकडे वाटचाल करणाच्या शहराच्या भविष्यासाठी नवीन पद्धतीची कौशल्ये, ज्ञान आणि क्षमता असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज
  • आव्हानांवर मात करण्यासाठी विविध महाविद्यालयांमध्ये हॅकॅथॉन
  • कौशल्ये व रोजगारावर भर देण्यासाठी फ्यूचर फेस्टिव्हल, जॉब फेअर अर्थात करिअर एक्‍स्पो
  • स्टार्टअप पीच फेस्ट, इनोव्हेशन इनक्युबेशन सेंटर, स्टार्टअप कल्चर, उद्योजकता प्रोत्साहनासाठी स्टार्टअप केंद्र
  • कौशल्य, पुन्हा व्यवसाय व करिअर समुपदेशन केंद्र
  • कौशल्य व प्रशिक्षण गरजा ओळखण्यासाठी आणि तरुणांना असंघटित क्षेत्रात रोजगार मिळवून देण्यात मदत

खेळ आणि आरोग्य

  • खेळांच्या सर्वाधिक सुविधा आणि ठिकाणे असल्याने देशातील खेळाचे केंद्र (हब) म्हणून ओळखले जाण्याची क्षमता
  • शालेय विद्यार्थ्यांच्या अ‍ॅथलेटिक्सला प्रोत्साहन देण्यासाठी म्युनिसिपल स्कूल स्पोर्ट्स लीग
  • नागरिकांमध्ये फिटनेस जनजागृतीसाठी सायक्लोथॉन व मॅरेथॉन
  • फिट पीसीएमसी, आरोग्य व तंदुरुस्तीबाबत नागरिकांसाठी ऑनलाइन व्यासपीठ
  • स्पोर्ट्स अकादमी, ॲडव्हान्स लर्निंग सेंटर; उत्कृष्ट खेळाडू विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती
  • सार्वजनिक क्रीडा सुविधेचा अवलंब करण्यासाठी स्पोर्ट फॅसिलिटी अडॉप्शन
  • लोकांना नॉन मोटराइज्ड वाहतूक व्यवस्था वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हॅप्पी स्ट्रीट

महिलांसाठी शहर सुरक्षित आहे, स्मार्ट होत आहे. पण, भविष्याचा विचार करता प्रदूषण नियंत्रण, पुरेसे पाणी, नद्यांचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे. मुलींसाठी व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधांमध्ये वाढ करायला हवी. काही प्रमाणात गुन्हेगारी व अवैध धंदे आहेत, ते बंद करण्यासाठी व शहर आणखी स्मार्ट करण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढणे महत्त्वाचे आहे.
- दिशा अनिल कर्पे, विद्यार्थिनी, अभियांत्रिकी, मोशी- प्राधिकरण

स्मार्ट सिटीअंतर्गत अनेक कामे सुरू आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी प्रशस्त रस्ते गरजेचेच आहेत. चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी अशा उपाययोजना महापालिका करीत आहे. याबरोबरच पर्यावरण संवर्धनही गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन निसर्ग संवर्धनाचा विचार करायला हवा.
- ऋतुजा जोगदंड, विद्यार्थिनी, एमबीए, पिंपळे गुरव

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com