पिंपरी-चिंचवड : कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी बुधवारी (ता. 11) पदाचा राजीनामा दिला.

पिंपरी : शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी बुधवारी (ता. 11) पदाचा राजीनामा दिला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे त्यांनी
राजीनामा सोपवला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत काम करण्याची संधी मिळाली, असे सांगून साठे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ''मी सहा वर्षांपासून पक्षाच्या शहराध्यक्षपदाची
जबाबदारी सांभाळत आहे. या कालावधीत प्रामाणिकपणे, निष्ठेने पक्षासाठी काम केले आहे. मी वैयक्तिक कारणावरून राजीनामा सोपवला आहे."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची मुंबईत भेट घेऊन राजीनामा दिला आहे. यापुढे पक्षासाठीच काम करणार आहे. माझ्या निर्णयावर मी ठाम आहे.
कोणत्याही परिस्थितीत राजीनामा मागे घेणार नाही, असेही साठे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad congress city president sachin sathe resigns