पिंपरी-चिंचवड शहरात इंग्लंडहून आलेल्या दोघांचे स्ट्रेन रिपोर्ट निगेटीव्ह; शहरात 75 नवीन रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 January 2021

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी 75 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 97 हजार 35 झाली आहे. आज 75 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 93 हजार 730 झाली आहे. सध्या एक हजार 543 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील तीन व शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी 75 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 97 हजार 35 झाली आहे. आज 75 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 93 हजार 730 झाली आहे. सध्या एक हजार 543 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील तीन व शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 762 झाली आहे. तर, शहराबाहेरील 734 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इंग्लंडहून आलेले व मुंबई विमानतळावर उतरलेल्या शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 188 प्रवाशांची तपासणी केली असून 181 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. एकूण सात जण पॉझिटीव्ह आढळले आहेत.

बर्थडे बॉयला वाढदिवस साजरा करणे पडले महागात 

50 प्रवाशी बाहेरगावी गेले आहेत. निगेटीव्ह आढळलेल्या सात जणांचे नमुने स्ट्रेन तपासणी (नवीन कोरोना) अर्थात जिनोम सिक्केसिंगसाठी पुण्यातील विषाणू राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्यातील दोन रिपोर्ट निगेटीव्ह आले असून पाच जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या महापालिका रुग्णालयांत 653 रुग्ण उपचार घेत आहेत. 890 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 921 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील तीन हजार 113 जणांची तपासणी केली. 789 जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 90 हजार 173 जणांना विलगीकरण करण्यात आले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad corona report negative patients england people