Pimpri Chinchwad Corona Update : शहरामध्ये दिवसभरात ३३ नवीन रूग्णांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

शहरामध्ये दिवसभरात ३३ नवीन रूग्णांची नोंद

पिंपरी : शहराच्या विविध भागातील ३३ नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील दोन रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील ४ हजार ४९९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील २ लाख ७६ हजार ७३० जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या ४३६ सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील १८८ रुग्ण गृहविलगीकरणात असून, २४८ सक्रिय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

शहरात मेजर कंटेन्मेंट झोन २१ आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन ३३० आहेत. आज दिवसभरात ९ हजार ४६१ नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत २३ लाख ९५ हजार ८१५ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

loading image
go to top