Pimpri Chinchwad Corportion : विकासकामांसाठी ७२ कोटी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri chinchwad

Pimpri Chinchwad Corportion : विकासकामांसाठी ७२ कोटी मंजूर

पिंपरी :विषय पत्रिकेवरील ३३ आणि ऐनवेळचे पाच अशा एकूण ३८ विषयांना स्थायी समितीने मंजुरी दिली, तर दोन विषय तहकूब ठेवण्यात आले. ग क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचर व्यवस्था, निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचे नूतनीकरण अशा विविध विकास कामांच्या सुमारे ७२ कोटी ६६ लाख रुपये मान्यता दिली. महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात गुरुवारी बैठक झाली. अध्यक्षस्थानी सभापती नितीन लांडगे होते.

खर्चास मंजुरी दिलेली कामे अशी ः प्रभाग क्रमांक तीन पेव्हिंग ब्लॉक बसविणे १८ लाख, प्रभाग पाचमधील रस्त्यांची खडी मुरूम आणि बीबीएम पद्धतीने दुरुस्ती २७ लाख, पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी आवश्यक उपकरण खरेदी ४३ लाख, मैला शुद्धीकरण पंपिंग स्टेशनमधील स्काडा प्रणालीचे चालन देखभाल आणि दुरुस्तीची कामे ९४ लाख. प्रभाग ३२ मधील शिवाजी पार्क, कृष्णानगर परिसरात स्थापत्यविषयक कामे १८ लाख, प्रभाग तीन किरकोळ दुरुस्ती कामे १९ लाख, पिंपरीतील प्रभाग २१ मधील सुभाषनगर, संजय गांधीनगर आणि परिसरातील झोपडपट्टी भागात किरकोळ दुरुस्तीची कामे ३४ लाख, प्रभाग २३ मधील स्मशानभूमी आणि घाट नूतनीकरण ८३ लाख.

ग क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय बहुउद्देशीय इमारतीमध्ये फर्निचर आणि स्थापत्यविषयक कामांसाठी ३ कोटी ८३ लाख खर्च केले जाणार आहेत. निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचे नूतनीकरण ६४ लाख, प्रभाग २२ ज्योतिबानगर येथील बाजीप्रभू चौक ते तापकीर मळा रस्त्यावरील विद्युत विषयक कामे ८२ लाख. प्रभाग ७ मधील कबड्डी प्रशिक्षण केंद्रातील विद्युत विषयक कामांसाठी १ कोटी ४५ लाख, भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाइनप्रमाणे विकसित २ कोटी २६ लाख, पिंपरीतील नवमहाराष्ट्र, पवनेश्वर आणि इतर मैदानावरील दिव्यांचे नूतनीकरण ९१ लाख.

loading image
go to top