
पिंपरी : रावेत पोलिसांच्या पथकाने एका अल्पवयीन आरोपीसह एका सराईत सोनसाखळी चोराला अटक केली. बालाजी राजू उमाप (वय २०, रा. गुलटेकडी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील चार, तर पुणे शहर हद्दीतील दोन असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले. चोरीचा माल घेणाऱ्यालाही अटक करण्यात आली. यश हरीश खर्डेकर (वय २४, रा. शिवदर्शन रोड, मुक्तांगण शाळेजवळ, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.