Cheating Young Girl : आंधळे प्रेम अंगलट; चुकलेला निर्णय, बदललेल्या नीतिमत्तेमुळे तरुणींची फसवणूक

दोघांचे प्रेम जुळल्यानंतर मोठमोठी स्वप्ने दाखवली जातात, लग्नाचे आमिष दाखवून जवळ येतात, फोटो, व्हीडिओही काढले जातात. मात्र, नंतर तरुणीला ब्लॅकमेल करण्याचा उद्योग सुरू होतो.
Love
LoveSakal
Summary

दोघांचे प्रेम जुळल्यानंतर मोठमोठी स्वप्ने दाखवली जातात, लग्नाचे आमिष दाखवून जवळ येतात, फोटो, व्हीडिओही काढले जातात. मात्र, नंतर तरुणीला ब्लॅकमेल करण्याचा उद्योग सुरू होतो.

पिंपरी - दोघांचे प्रेम जुळल्यानंतर मोठमोठी स्वप्ने दाखवली जातात, लग्नाचे आमिष दाखवून जवळ येतात, फोटो, व्हीडिओही काढले जातात. मात्र, नंतर तरुणीला ब्लॅकमेल करण्याचा उद्योग सुरू होतो. यातून पैसे उकळले जातात. पैसे देण्यास अथवा शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्यास मारहाण, जीव घेण्यापर्यंत प्रकरण जाते. यामध्ये तरुणीचा चुकलेला निर्णय, चुकलेली निवड, समोरील व्यक्तींची बदललेली नीतिमत्ता यामुळे अनेक तरुणींची फसवणूक होत असून, आंधळे प्रेम अंगलट’ येत असल्याचे प्रकार घडत आहेत.

तरुणी, विवाहित महिला प्रेमात पडतात. मात्र, पुढे काय होईल याचे त्यांना त्यावेळी भान नसते. प्रेमाच्या जाळ्यात ओढून जवळीक साधली जाते. मात्र, जेव्हा लग्नाचा मुद्दा समोर येतो. त्यावेळी लग्नास नकार दिला जातो. तरुणीसोबतचे अश्लील फोटो, व्हीडिओ काढून त्याद्वारे तरुणीला धमकाविण्याचे प्रकार घडतात. यातून तरुणीच्या जिवाला धोका निर्माण होतो. बदनामीची भीती दाखवून आर्थिक शोषण केले जाते. आयुक्तालयाच्या हद्दीत असे अनेक प्रकार समोर आले आहेत. फसवणुकीनंतर पश्चात्ताप करून घेण्यापेक्षा अगोदरच सावध राहणे आवश्यक आहे.

कारणे

  • हव्यासापोटी घेतलेले चुकीचे निर्णय

  • दूरदृष्टीचा अभाव

  • विभक्त कुटुंब पद्धतीमुळे वडीलधाऱ्या व्यक्तींच्या सल्ल्याची कमतरता

  • कायद्याची न राहिलेली भीती

  • टीव्ही मालिका, चित्रपट, सोशल मीडियाचा प्रभाव

  • कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद नसणे

उपाय

  • पालकांनी मुलांशी सुसंवाद ठेवणे

  • मुलांच्या वर्तणुकीतील बदल पालकांनी ओळखायला हवे

  • मुली, महिला यांना कायद्याची माहिती देणे

  • फोटो, व्हीडिओ काढण्याचा हव्यास टाळणे आवश्यक

मागील दीड महिन्यात घडलेल्या घटना

  • १ मार्च - शादी डॉट कॉमवरून तरुणीशी संपर्क करून शरीर संबंध प्रस्थापित करीत १९ लाखांची आर्थिक फसवणूक

  • २ मार्च - लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर ठिकठिकाणी अत्याचार

  • ३ मार्च - हिंजवडीत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार. क्रेडिट कार्डवरून साठ हजार रुपये खर्च

  • ६ मार्च - कुटुंबीयांना संपवून टाकण्याची, बदनामीची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

  • ८ मार्च - चिंचवडमध्ये तरुणीला प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार. अकाउंटमधून, फोन पेद्वारे पैसे काढून फसवणूक

  • १४ मार्च - भोसरीत महिलेचे अश्लील फोटो काढून व्हायरलची धमकी देत अत्याचार

  • १५ मार्च - हिंजवडीत अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढून मुलीवर अत्याचार

  • २१ मार्च - थेरगावात अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून अत्याचार

  • २४ मार्च - बावधनमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तरुणीचे १७ लाख उकळले

  • २६ मार्च - लग्नाअगोदरच्या मित्राबाबत पतीला सांगण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार, रोकड व सोन्याचे दागिने घेतले

  • २८ मार्च - रहाटणीत महिलेला पाण्यातून गुंगीकारक औषध पाजून अत्याचार

  • ३० मार्च - भावाला मारून टाकण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार, अश्लील फोटो काढून व्हायरलची धमकी

  • दोन ते दहा एप्रिल या काळात अशांच फसवणुकीच्या पाच घटना घडल्या

कोणावर विश्वास ठेवताना अनेकदा विचार करणे आवश्यक आहे. समोरील व्यक्तींबाबत पूर्ण खात्री पटल्याशिवाय कसलाही संबंध ठेऊ नये. फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधा.

- प्रेरणा कट्टे, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

प्रलोभनाला बळी न पडता समोरील व्यक्तीची योग्य पारख करणे गरजेचे आहे. कोणत्याही बाबतीत सर्व बाजूंनी विचार करा. सोशल मीडियाचा सांभाळून वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. लग्नासारखा मोठा निर्णय कुटुंबीयांना विश्वासात घेऊनच घ्या. कुटूंबातील सदस्यांशी संवाद ठेवा. सर्व गोष्टींबाबत त्यांच्याशी चर्चा करा.

- संध्या जाधव, समुदेशिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com