esakal | Breaking : पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरांचा तडकाफडकी राजीनामा!

बोलून बातमी शोधा

Breaking : पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरांचा तडकाफडकी राजीनामा!}

पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांनी आज शुक्रवारी (ता. 5) सायंकाळी पदाचा राजीनामा महापौर उषा ढोरे यांच्याकडे दिला.

Breaking : पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरांचा तडकाफडकी राजीनामा!
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांनी आज शुक्रवारी (ता. 5) सायंकाळी पदाचा राजीनामा महापौर उषा ढोरे यांच्याकडे दिला. वैयक्तिक कारणावरून राजीनामा दिल्याचे घोळवे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आहे. केशव घोळवे यांची सहा नोव्हेंबर रोजी निवड झाली होती. त्यापूर्वीचे उपमहापौर तुषार हिंगे यांचा पक्षाने मुदत पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा घेतला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला न्याय देताना पक्षाने गुळवे यांच्या गळ्यात उपमहापौरपदाची माळ घातली होती. मात्र, सूत्रे स्वीकारल्यानंतर चारच महिन्यात त्यांनी पदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे आज स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होती. दुपारी बारा वाजता निवडणूक झाली. भाजपचे नितीन लांडगे यांची दहा विरुद्ध पाच मतांनी निवड झाली. त्यानंतर अवघ्या काही तासातच घोळवे यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय बदलाबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. मात्र, आपण वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला असल्याचे घोळवे यांनी सांगितले.