शेतकरी आंदोलनाला चीन, पाकिस्तानातून फंडिंग; पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरांचं वादग्रस्त विधान 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

  • भाजपचे उपमहापौर केशव घोळवे यांनी सर्वसाधारण सभेत वादग्रस्त विधान केले. 

पिंपरी : "कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला चीन, पाकिस्तानमधून फंडिंग होते की काय? असे वातावरण आहे. आंदोलनाला लोक रोजंदारीने आणली जात आहेत,'' असे वादग्रस्त विधान भाजपचे उपमहापौर केशव घोळवे यांनी सर्वसाधारण सभेत केले. 

भारत बंदचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतही पडसाद; सर्वसाधारण सभेत जोरदार घोषणाबाजी

सभेच्या सुरुवातीलाच शेतकरी कायद्याविरोधात सत्ताधारी भाजप वगळता राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली. यावेळी चर्चेत भाग घेताना घोळवे म्हणाले, "कृषी कायदे शेतकरी हिताचे आहेत की नाही, हे तपासायला हवे. तज्ज्ञांच्या शिफारशी केंद्राने स्वीकारलेल्या आहेत. त्यामुळे विरोधाला विरोध नसावा. एकंदरीतच शेतकरी आंदोलन पाहता आंदोलनाला चीन, पाकिस्तानमधून फंडिंग होते की काय? असे वातावरण आहे. आंदोलनाला लोकं रोजंदारीने आणली जात आहेत.'' 

मणप्पूरम फायनान्सच्या पिंपरी-चिंचवडमधील सोळा शाखा बंद! 

उपमहापौरांचे हे वादग्रस्त विधान कामकाजातून काढून टाकावे, अशी सूचना भाजप नगरसेविका सीमा सावळे यांनी केली. मात्र, महापौरांनी या सूचनेकडे काणाडोळा केला. शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, "उपमहापौरांनी शेतकरी आंदोलनावर केलेले वक्तव्य चुकीचे आहे. चीन, पाकिस्तानच्या नावावर कोण राजकीय पोळी भाजताहेत, हे अख्खा देश पाहतोय. घोळवेंनी माफी मागायला हवी. आम्ही त्यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध नोंदविला आहे.'' विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, ""शेतकरी आंदोलनाबद्दल अशा पद्धतीने वक्तव्य करणे म्हणजे शेतकरी आंदोलनाची थट्टा करणे होय. हे वक्तव्य निंदनीय आहे. उपमहापौरांनी देशातील शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो.'' 

भारत-पाकिस्तान, भारत-चीन सीमारेषेवर जशी परिस्थिती आहे. तशीच परिस्थिती विरोधक देशात निर्माण करत आहे, असे उपमहापौरांना बोलायचे होते, अशी सारवासारव भाजपचे गटनेते नामदेव ढाके यांनी केली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad deputy mayor keshav gholave's controversial statement of regarding farmers agitation