esakal | मोठी बातमी : पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरांचा तडकाफडकी राजीनामा
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC_Tushar_Hinge

अनेकदा 'लक बाय चान्स' असा शब्द प्रयोग वापरला जातो. तो हिंगे यांच्याबाबतीत खरा ठरला होता. कारण, उपमहापौरपदी निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार शीतल शिंदे होते.

मोठी बातमी : पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरांचा तडकाफडकी राजीनामा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी बुधवारी (ता.१४) दुपारी तडकाफडकी राजीनामा दिला. महापौर उषा ढोरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. राजीनाम्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, "पक्षाचा आदेश असल्यामुळे राजीनामा दिला,'' असे हिंगे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितला. 

महापालिकेत भाजपची सत्ता आहे. गेल्या वर्षी 22 नोव्हेंबर रोजी महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक झाली होती. मतदानाद्वारे 128 पैकी 81 मतांनी विजय मिळवत महापौरपदी उषा ढोरे विराजमान झाल्या होत्या. त्याच दिवशी उपमहापौरपदी भाजपकडून तुषार हिंगे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राजू बनसोडे रिंगणात होते. मात्र, ऐनवेळी बनसोडे यांनी माघार घेतल्याने हिंगे यांची उपमहापौरपदी वर्णी लागली होती. 

‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता

'लक बाय चान्स' 
अनेकदा 'लक बाय चान्स' असा शब्द प्रयोग वापरला जातो. तो हिंगे यांच्याबाबतीत खरा ठरला होता. कारण, उपमहापौरपदी निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार शीतल शिंदे होते. मात्र, आजारी असल्याचे कारण सांगून ते नगरसचिवांकडे अर्ज भरण्याच्या वेळी अनुपस्थित राहिले. अर्ज भरण्याच्या मुदतीच्या कालावधीसाठी अवघे पाच मिनिटे बाकी असताना भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी हिंगे यांच्या हाती अर्ज सुपूर्द केला होता. आणि उपमहापौरपदाची त्यांना संधी मिळाली होती. 

एकाच वेळी दोन पदे 
हिंगे यांना अचानकपणे उपमहापौरपद मिळाले होते. त्या वेळी ते कला-क्रीडा-सांस्कृतिक समितीचे अध्यक्षही होते. एकाच वेळी दोन पदांची जबाबदारी त्यांच्याकडे आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली 2019-20 च्या महापौर चषक क्रीडा स्पर्धाही झाल्या होत्या.

 पुण्यातील 68 वर्षीय आजोबांना नडला डेटिंगचा मोह!

पुन्हा एकदा 'लक' 
मार्चमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला. शहर लॉकडाऊन झाले. याच कालावधीत 14 जून रोजी महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहरसुधारणा आणि कला-क्रीडा-सांस्कृतिक या विषय समित्यांची मुदत संपली होती. लॉकडाउनमुळे कोणत्याही निवडणुका न घेण्याचे राज्य सरकारचे आदेश होते. त्यामुळे सर्व विषय समित्या बरखास्त झाल्या होत्या. तेव्हापासून त्यांचे कक्ष ओस पडलेले होते. अपवाद फक्त कला- क्रीडा-सांस्कृतिक समितीचा होता. कारण, ही समितीही बरखास्त झालेली असताना हिंगे यांचे उपमहापौरपद मात्र शाबूत होते. त्यामुळे या समितीच्या कार्यालयात बसूनच ते कामकाज करीत होते. आता दहा महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांना उपमहापौर पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)