Pimpri Chinchwad: वाहतूक कोंडीला मिळणार दिलासा! पिंपरी-चिंचवडमध्ये धावणार अत्याधुनिक ‘ई-आरटीएस’, महापालिकेला मुख्यमंत्र्यांचे निर्देश

CM Pushes Fast Track E RTS Project: पिंपरी-चिंचवडमध्ये ई-आरटीएसला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील; महामार्ग, मेट्रो व बीआरटीला जोडणारी वेगवान, पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याला गती
Pimpri Chinchwad Traffic Relief Through E RTS Project CM Fadnavis Instructs Civic Body to Accelerate Work

Pimpri Chinchwad Traffic Relief Through E RTS Project CM Fadnavis Instructs Civic Body to Accelerate Work

sakal

Updated on

पिंपरी: ‘‘पिंपरी चिंचवड शहरात ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती द्यावी. त्यासाठी महापालिकेने सर्व कामे तातडीने सुरू करून प्रायोगिक प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करावा. नागरिकांना आधुनिक, पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करावी,’’ अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक, मुंबई-पुणे आणि मुंबई-बंगळूर महामार्ग आणि मेट्रो मार्गही जोडले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com