Pimpri chinchwad : औंध येथे फटाक्यांमुळे इमारतीत आग. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri chinchwad

Pimpri chinchwad : औंध येथे फटाक्यांमुळे इमारतीत आग.

औंध : येथील डीपी रस्त्यावरील इंडियन बॅंकेजवळील टेरेजा या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर एक सदनिका फटाक्यांमुळे आग लागल्याने जळाल्याची दुर्घटना रात्री साडेदहा वाजता घडली.यात सदनिकेतील फर्निचर जळून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले असून आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

या दुर्घटनेत कुठलीही जिवीत हानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सदनिकेत आग लागल्याने एकच गोंधळ उडाला होता. अग्निशमन दलाला याबाबत कळवण्यात आल्यानंतर तातडीने पीएमआरडीएचे दोन व पालिकेच्या पाच. अशा एकूण सात अग्निशमन दलाच्या बंबांनी हि आग विझवली.खबरदारी म्हणून तीन रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.