पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस दलात नव्याने पाच सहाय्यक पोलिस आयुक्तांची नियुक्ती झाली. तीन दिवसांपूर्वी राज्यातील पोलिस उपअधीक्षक तसेच सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या तसेच पोलिस निरीक्षकांची पदोन्नती झाली. यात पाच सहाय्यक पोलिस आयुक्तांची बदली झाली. राज्याचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी याबाबतचे आदेश दिले.