
पिंपरी : राज्याचे विधिमंडळ अधिवेशन १८ जुलैला संपले. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीसह लगतच्या हिंजवडी आयटी पार्क आणि मावळ तालुक्याला काय मिळाले? असे प्रश्न आता चर्चेत आले आहेत. राज्य सरकार बरोबरच केंद्र सरकारचे विविध पुरस्कार महापालिकेने मिळवले आहेत. विविध मोठ्या प्रकल्पांची घोषणाही केली आहे. काही प्रकल्प कागदावर आहेत. यामध्ये वर्षानुवर्षे भेडसावणारे किंवा चर्चेत असलेले एचसीएमटीआर, भूसंपादन, नदी प्रदूषण, रस्त्यांची निर्मिती, रुंदीकरण यांचा समावेश आहे. प्रकल्पांसाठी अधिकाधिक निधी आणणे अपेक्षित होते. काही प्रकल्पांबाबत सामान्य नागरिकांच्या दृष्टीने निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, त्यात फारसे यश न मिळाल्याचे चित्र आहे.