महत्त्वाची बातमी! पिंपरी-चिंचवडच्या झोनबाबत होणार फेरविचार?

महत्त्वाची बातमी! पिंपरी-चिंचवडच्या झोनबाबत होणार फेरविचार?

पिंपरी : पिंपरी-चिंचवड. पुण्याचे जुळं शहर. अधिकारी, कर्मचारी, उद्योजक, कामगार, व्यापारी, डॉक्टर, नर्स, वकील अशा विविध क्षेत्रांबाबत एकमेकांवर अवलंबून. कारण, येथील बहुतांश व्यक्ती दोन्ही शहरांशी संबंधित आहेत.

पुण्यात काम करणारी व्यक्ती पिंपरी-चिंचवड मध्ये तर,  पिंपरी चिंचवड शहरात काम करणारी व्यक्ती पुण्यात राहणारी आहे. त्यांची रोजची ये-जा सुरूच असते. असे असताना पुण्याला रेड झोनमध्ये ठेवणे आणि पिंपरी चिंचवड वगळणे कितपत उपयुक्त ठरणार आहे. शिवाय, पिंपरी चिंचवड शहरात गेल्या आठ दिवसांपासून दररोज दहापेक्षा अधिक कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळत आहेत. त्यानुसार कंटेन्मेंट झोन वाढवले जात आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवाय, पुणे शहरासह जिल्हा व जिल्ह्याबाहेरील रुग्ण सुद्धा येथे दाखल होत आहेत. त्यामुळे रेड झोनमधून शहर वगळणे योग्य होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या नवीन आदेशामुळे महापालिका प्रशासनही गोंधळात पडले आहे. या आदेशाची अंमलबजावणी 22 मे पासून होणार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हातात आणखी दोन दिवस आहेत. या दोन दिवसांत शहराचा आढावा घेऊन रेड झोनमधून शहर वगळण्याच्या सरकारच्या निर्णयावर पुनर्विचार होऊ शकतो. सध्या तरी, रेड झोन कायम ठेवावे या विचारात प्रशासन दिसतंय. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वस्तुस्थिती...

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढत असून, उपाययोजनांसाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. रुग्ण आढळलेले भाग प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) जाहीर करून सील केले जात आहेत. आजपर्यंत 69 ठिकाणे सील केली असून, त्यातील 27 पूर्ण झाले आहेत. म्हणजे येथील रुग्ण बरे होऊन घरी पोचले आहेत. मात्र, पाच कंटेनमेंट झोन पहिल्यापासून सीलच आहेत. कारण, तेथील रुग्ण संख्या वाढतच आहे. सध्या 45 कंटेनमेंट झोन आहेत. शिवाय, महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी (ता. 20) सकाळी आठ वाजेपर्यंत संसर्ग झालेल्या नागरिकांची एकूण संख्या 233 होती. त्यातील 133 जण बरे झालेले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात मंगळवारी मृत्यू झालेल्या महिलेसह दोघांचा समावेश आहे. सध्या 95 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत उच्चभ्रू व मध्यमवर्गीय सोसायटीत आढळणारा संसर्ग गेल्या चार-पाच दिवसांपासून झोपडपट्टीत शिरला आहे. आनंदनगरमध्ये एकाच दिवशी सोमवारी (ता. 18) तब्बल 18 जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. तेथील एकूण रुग्ण संख्या 33 झाली आहे. त्यामुळे नवीन भागात रुग्ण सापडत असल्याचे दिसून येत असून, ते "कंटेन्मेंट झोन' जाहीर केले जात आहेत.

महिन्यापेक्षा अधिक कंटेन्मेंट झोन

खराळवाडीत 16 मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून म्हणजे दोन महिन्यांपासून हा भाग कंटेन्मेंट झोन आहे. तसेच, शिवनेरी कॉलनी पिंपळे गुरव, रुपीनगर, गंधर्वनगरी मोशी व विजयनगर दिघी येथे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण आढळले होते. हे भागही एक महिन्यापेक्षा अधिक काळ कंटेन्मेंट झोन आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्याचे अन्य कंटेन्मेंट झोन

पिंपळे सौदागर शुभश्री सोसायटी, साई पॅरेडाईज; फुगेवाडी; आकुर्डी शुभश्री परिसर; पिंपळे गुरव जगताप कॉम्पलॅक्‍स, शिवनेरी कॉलनी, विनायकनगर, कवडेनगर; भोसरी गुरुविहार सोसायटी, लांडगेनगर, हनुमान कॉलनी, हुतात्मा चौक, चक्रपाणी वसाहत; जुनी सांगवी मधुबन सोसायटी, पवनानगर; काळेवाडी; रहाटणी छत्रपती चौक, तांबे शाळा, तापकीर चौक, ज्ञानगंगा गृहनिर्माण सोसायटी; वाकड कस्पटे वस्ती; थेरगाव दत्तनगर; चिंचवड स्टेशन इंदरानगर, मोहननगर, आनंदनगर; किवळे विकासनगर; मोशी बनकर वस्ती, वुड्‌स विले; दिघी विजयनगर, अमृतधारा; चऱ्होली निकमवस्ती, साठेनगर; रुपीनगर पंचदुर्गा परिसर; तळवडे न्यू अँजल स्कूल; चिखली ताम्हाणे वस्ती, मोरेवस्ती; संभाजीनगर आंब्रेला गार्डन, बजाज स्कूल; पिंपरी भाटनगर. 

कंटेन्मेंट झोनमुक्त भाग

पिंपळे सौदागर गावठाण; कासारवाडी रामराज प्लॅनेट; ताथवडे गावठाण चौक; वाकड कावेरीनगर, जीवननगर; पिंपरी तपोवन रोड; नेहरुनगर; दापोडी गणेशनगर; पिंपळे सौदागर गावठाण; पिंपळे निलख शिवाजी चौक; पुनावळे कुंभार गल्ली, ओव्हाळवस्ती; थेरगाव 16 नंबर बसथांबा, शिवतेजनगर, क्रांतिवीरनगर, पडवळनगर, गणराज कॉलनी; भोसरी खंडोबा माळ, पीएमटी चौक, आदिनाथनगर, शास्त्री चौक, गुरुदत्त कॉलनी; मोशी नागेश्‍वरनगर; चऱ्होली तनिष्क; दिघी बीयू भंडारी, रोडे हॉस्पिटल, तनिष्क आयकॉन; संभाजीनगर; चिखली घरकूल. 

सरकारचा नवीन आदेश

राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार शहराला रेड झोनमधून वगळण्यात आले आहे. नवीन आदेश गुरुवारपासून (ता. 22) अंमलात येणार आहेत. मात्र, कंटेन्मेट झोनमध्ये पूर्वीप्रमाणेच आदेश लागू राहणार आहेत. 

रेड झोनमधून वगळण्याचा परिणाम

कोरोनाच्या संसर्गामुळे पिंपरी चिंचवड शहर रेड झोनमध्ये आहे. मात्र, राज्य सरकारने मंगळवारी नवीन आदेश काढला. त्यानुसार शहराला रेड झोनमधून वगळण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास....

- सार्वजनिक बस वाहतूक अर्थात एसटी व पीएमपी बस सेवा,  हॉटेल्स, मॉल आणि सलूनची दुकाने बंद राहणार आहेत. 

- 65 वर्षांवरील व्यक्ती, दहा वर्षांखालील मुले आणि गरोदर स्त्रियांना प्रवास करण्यास मनाई असेल. 

- टॅक्‍सी, कॅब, रिक्षा, खासगी चारचाकी वाहन यातून चालक आणि दोन प्रवाशांनाच प्रवास करण्यास परवानगी असेल.

- दुचाकीवर एकच जण प्रवास करू शकेल. 

- शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील मनुष्यबळ पूर्ववत करण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले....

राज्य सरकारने पिंपरी चिंचवड शहराला रेड झोनमधून वगळले आहे. आदेशाची अंमलबजावणी 22मे पासून केली जाणार आहे. त्याबाबतची नियमावली दोन दिवसांत तयार करून अंमलबजावणी केली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com