

Metro work clogs Pimpri-Chinchwad roads
sakal
पिंपरी : सध्या पिंपरी ते भक्ती-शक्ती चौक या दुसऱ्या टप्यातील कामांना वेग आला आहे. या मार्गिकेवरील चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या परिसरांतील प्रमुख चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले आहेत. खांब उभारण्यासाठी लोखंडी बॅरिकेड्स लावल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी, वाहनचालकांना वाट शोधणे कठीण झाले आहे. नागरिकांना दररोजच्या प्रवासात त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय, हा प्रवास वेळखाऊ होत आहे.