

Pimpri
esakal
पिंपरी: एकच मार्ग, त्याचाही विस्तार कूर्मगतीने, बहुतांश स्थानकांवर वाहनतळ नाही, तेथे जाण्यास सार्वजनिक वाहतुकीची पुरेशी साधने नाहीत, लास्ट माइल कनेक्टिव्हिटीमध्ये वेळापत्रकापासून फीडर सेवेपर्यंत अडथळे...उद्योगनगरीतील प्रवाशांना मेट्रोचा पुरेपूर आणि सोयीस्कर वापर करता येत नाही यासाठी ही अशी कारणे आहेत. राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे मेट्रो प्रशासनाच्या पातळीवर वेगवान कार्यवाही होत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.