MLA Praniti Shinde : कॉंग्रेसच महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA-Praniti-Shinde

भारत जोडो यात्रा ही राजकीय हेतूसाठी नव्हतीच. ही खुप मोठी लढाई देश व लोकशाही वाचविण्यासाठी आहे. आम्ही सत्तेसाठी नाही तर; लोकशाही भक्कम व खंबीर करण्यासाठी लढतोय.

MLA Praniti Shinde : कॉंग्रेसच महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देईल

पिंपरी - भारत जोडो यात्रा ही राजकीय हेतूसाठी नव्हतीच. ही खुप मोठी लढाई देश व लोकशाही वाचविण्यासाठी आहे. आम्ही सत्तेसाठी नाही तर; लोकशाही भक्कम व खंबीर करण्यासाठी लढतोय. आम्ही अदानी घोटाळा, महागाई, बेरोजगारी या विरुध्द लढणारच, असा ठाम विश्‍वास कॉंग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष व आमदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी (ता. ३१) पिंपरी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपचे नरेंद्र मोदी सरकार अदानी यांना वाचविण्यासाठी सुडबुध्दीने कारवाई करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, नारेंद्र बनसोडे, शाम आगरवाल, माजी महापौर कविचंद भाट, अशोक मोरे, सायली नढे आदि उपस्थित होते.

राहुल गांधी यांच्यावर केंद्र सरकारने केलेल्या कारवाईची महिती देऊन प्रणिती शिंदे म्हणाल्या की, हा देश पंडीत नेहरु व महात्मा गांधी यांचा आहे. त्यांचे नाव तुम्ही पुसू शकत नाही. अशीच ओळख कायम राहणार.

देशात लोकशाही पायदळी तुडवली जात आहे. देशाची हुकुूमशाहीकडे वाटचाल सुरु आहे. देशात धार्मिक, जातीय तेढ निर्माण करुन जातीयवादीला खतपाणी घातले जात आहे. भारत जोडो यात्रेतून कॉंग्रेसने सर्व धर्म समभावाची मूमिका मांडली. सावरकर यांच्या भूमिकेविषयी जेष्ठ नेते शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकेचा राहुल गांधी यांनी आदरच केला आहे. आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेत असतो, असेही त्यांनी सांगितले.

‘कॉंग्रेसच महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देईल’

चांगले उमेदवार येतील तेव्हा कॉंग्रेसच महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देईल, याबाबत मला शंका नाही, असेही आमदार प्रणिती शिंदे यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

आरएसएस व भाजपची विचारणी महिलां विरोधी : प्रणिती शिंदे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) व भारतीय जनता पार्टी यांच्याकडून वारंवार महिलांबाबत खालच्या पातळीवर व चुकीची विधाने केली जातात. त्यांच्याकडून महिलांना वस्तू म्हणून बघितले जाते. आपला देश साधू, संतांचा, पुरोगामी विचारांचा आहे. तो प्रतिगामी विचारांकडे नेण्याचे काम हे लोक करत आहेत. देशाला पहिली महिला पंतप्रधान, राष्ट्रपती कॉंग्रेसने दिली. भारतमाता ही महिलाच आहे. देश पुढे नेण्या ऐवजी मागे जाण्याच्या मानसिकतेकडे जातोय, अशी टिकाही आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.