Chinchwad News : धाकट्या मुलाचं लग्न चार दिवसांवर, स्वयंपाकाची तयारी सुरू असताना आईचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू!
Tragedy Strikes Days Before Son's Wedding : चिंचवडमधील मोहननगर परिसरात, धाकट्या मुलाचे लग्न चार दिवसांवर आले असताना, पाणी काढताना तोल जाऊन पाण्याच्या भूमिगत टाकीत पडून आशा संजय गवळी (वय ५२) या आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गवळी कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पिंपरी : धाकट्या मुलाचे लग्न चार दिवसांवर आले असताना आईचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. चिंचवडमधील मोहननगर परिसरात शुक्रवारी (ता. ३१) सकाळी ही दुर्घटना घडली. यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.