esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये १४१ नवीन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona

पिंपरी-चिंचवडमध्ये १४१ नवीन रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी १४१ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७० हजार ६१० झाली आहे. आज २४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ६५ हजार ८० झाली आहे. सध्या एक हजार ४३६ सक्रिय रुग्ण आहेत.

आजपर्यंत शहरातील चार हजार ४०४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत ५९० रुग्ण उपचार घेत आहेत. ८४६ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत १५ लाख ४१ हजार ४८५ व्यक्तींना लस देण्यात आली आहे.

हेही वाचा: IND vs ENG : इंग्लंडला लगाम; टीम इंडियानं वसूल केला 'लगान'

शहरात सध्या ५१ मेजर व ४११ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ५३७ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. एक हजार ९९५ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

loading image
go to top